MahaDBT Cotton Picking Bags : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती कापूस वेचणी/साठवणूक बॅग वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू करण्यात आले आहे. आज दिनांक 02 ऑगस्ट पासून कापूस वेचणी/साठवणूक बॅग साठी कृषि विभागाच्या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहेत तरी याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. 


कापूस शेतीत कापूस वेचणी करताना त्याची साठवणूक करणे हे काम जिकरीचे ठरते त्यामुळे शेतकर्‍यांना कापूस वेचणी करताना विशिष्ट स्वरूपाची एक तात्पुरत्या साठवणुकी साठी कापूस वेचणी/साठवणूक बॅग विकसित करण्यात आली आहे. तर, ही बॅग आता कृषि विभागाच्या मार्फत शेतकर्‍यांना मोफत पुरविण्यात येणार आहे. परंतु, त्यासाठी इच्छुक शेतकर्‍यांना कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. (MahaDBT Cotton Picking Bags)


ऑनलाइन प्राप्त अर्जा मधून सोडत काढण्यात येणार असून त्या सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांना कापूस वेचणी/साठवणूक बॅग ही 100% अनुदानावर म्हणजेच मोफत देण्यात येणार आहेत. तर, शेतकरी बांधवांनी खालील पद्धतीने कापूस वेचणी/साठवणूक बॅग साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. (MahaDBT Cotton Picking Bags)



तर, हे कापूस साठवणूक बॅग हेक्टरी ८ या प्रमाणे वितरण करन्यात येणार आहे तरी इच्छुक शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. 



अर्ज करणेची पध्दत :- (MahaDBT Cotton Picking Bags)

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

आधार कार्ड (Aadhar Card)

रेशन कार्ड (Ration Card)

रहिवासी दाखला (Residence Proof)

अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)

अर्जदाराच्या जमिनीचा अट अ.  ( 8A)

मोबाईल नंबर (Mobile Number)

ई-मेल आयडी (Email ID)

पासपोर्ट साईजचे दोन फोटो (2 Passport Size Photographs)

स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)

जातीचा दाखला (Caste Certificate)


1. भेट द्या

अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल किंवा खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.



लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकणे आणि लॉगिन करणे



2. अर्ज करा बाबीवर क्लिक करणे 



3. बियाणे, औषधे व खते -> बाबी निवडा यावर क्लिक करणे 



4. बाब निवडा मध्ये –» साठवणूक सुविधा निवडणे



5. पिक निवडा मध्ये – कापूस निवडणे 



6. अनुदान हवी असलेली बाब – कापूस साठवणूक बॅग


7. क्षेत्र निवडणे


8. अर्ज जतन करणे आणि मेन्यू वर जाऊन अर्ज सादर करणे.

तर, वरील प्रमाणे आपण कापूस वेचणी/साठवणूक बॅग साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. 




Cotton storage bag subsidy 2024:कापूस साठवणूक बॅग अनुदान २०२४-महत्वाचे योजनेचा अर्ज आपल्याला 31 ऑगस्ट 2024 च्या पूर्वी भरायचा आहे.

 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now